खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यास उदंड प्रतिसाद
कराड :कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रचारदौरा अंतर्गत आज कराड शहरात बाईक रॅली मोठ्या उत्साहात मोठ्या जोशात तरुणांच्या, महिला भगिनींच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी सातारा लोकसभा निवडणूक प्रमुख श्री अतुल भोसले, नगरसेवक श्री राजेंद्रसिंह यादव, श्री सुनील काटकर, श्री विजयसिंह यादव, कराड दक्षिण समन्वयक श्री संग्राम बर्गे, श्री बाळासो राक्षे आदी मान्यवर व असंख्य समर्थक महिला भगिनी उपस्थित होत्या. कराड दक्षिण मधील मतदार निश्चितच यावेळेस उदयनराजेंना लीड देणार आहेत.