Post Views: 100
काळेश्वरी नवरात्रोत्सव मंडळ व ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
केळघर प्रतिनिधी-नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरोशी येथील काळेश्वरी नवरात्रोत्सव मंडळ व ग्रामपंचायत वरोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक आरोग्य मार्गदर्शक शिबिर नुकतेच पार पडले.
या शिबिरात आरोग्य सल्लागार मंगेश जाधव व भाग्यश्री भालेराव यांनी उपस्थितांना आयुर्वेदिक उपचारपद्धती, संतुलित आहार, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी सरपंच विलास शिर्के, ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे, नामदेव कासुर्डे, केशव कासुर्डे, सुरेश कासुर्डे, राजेंद्र गहीणे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
