कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जुन्या पारंगे चौकाचे नामांतर “माहिती अधिकार चौक” व जुना RTO चौकास “संविधान चौक” तसेच वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास “शिवतीर्थ मार्ग“असे नामांतर करण्याची सातारा वासियांची मागणी.

जुन्या पारंगे चौकाचे नामांतर “माहिती अधिकार चौक” व जुना RTO चौकास “संविधान चौक” तसेच वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास “शिवतीर्थ मार्ग“असे नामांतर करण्याची सातारा वासियांची मागणी.

जुन्या पारंगे चौकाचे नामांतर “माहिती अधिकार चौक” व जुना RTO चौकास “संविधान चौक” तसेच वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास “शिवतीर्थ मार्ग“असे नामांतर करण्याची सातारा वासियांची मागणी.

सातारा : सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून या जिल्ह्यास ऐतिहासिक वारसा आहे. श्री. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आहे. प्रत्येक नवीनतम उपक्रमाची सुरवात करण्यास सातारा जिल्हा अग्रेसर आहे. अश्या या शहरातील जुन्या पारंगे चौकास “ माहिती अधिकार चौक” व जुना RTO चौकास “संविधान चौक” आणि वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास “शिवतीर्थ मार्ग“असे नामांतर केल्यास जनसामान्यापर्यंत या कायदा व इतिहासाविषयी जनजागृती कायम स्मरणात राहील. माहिती अधिकार कायदा हा सर्व सामान्यांना आपल्या न्यायिक हक्कासाठी न्याय मिळवून देणेसाठी वापरला जातो. सदर कायद्याची म्हणावी अशी जनजागृती समाजात व प्रशासनामध्ये झालेली दिसून येत नाही. या चौकास तसे नाव दिल्यास सर्व सामान्यांना यामुळे वेळोवेळी कायद्याची जाणीव राहील. या देशाचा पवित्र ग्रंथ म्हणून संविधानाकडे पहिले जाते. सर्वसामान्य, दिनदलित, गोरगरीब, सर्व जाती धर्मातील समाज्याला संविधानामधून न्याय मिळत आहे. श्री. छ. शिवाजी महाराज यांची देश विदेशात ख्याती आहे.

पोवई नाका येथे मिळणाऱ्या आठ रत्याच्या मधोमध श्री. छ. शिवाजी महाराजांच्या नावाने “शिवतीर्थ” उभारण्यात आले आहे. सर्व शिव भक्तांचे श्रद्धा स्थान असलेल्या या शिवतीर्थाच्या नावाने वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास “शिवतीर्थ मार्ग” नाव दिल्यास श्री. छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव लोकांपर्यंत पोहचेल.  

            यासाठी सातारा शहरातील जुन्या पारंगे चौकास “ माहिती अधिकार चौक” व जुना RTO चौकास “संविधान चौक” तसेच वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास “शिवतीर्थ मार्ग “ असे नामांतर करण्याची मागणी सातारा वासियांनी नगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात महारुद्र तिकुंडे ( माहिती अधिकार ) संस्थापक – अध्यक्ष युवा राज्य फाऊंडेशन हे पाठपुरावा करीत आहेत. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket