मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी

जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी

जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी

जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणचे आयोजन – प्रमुख पाहुण्या माजी महिला पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर

फलटण प्रतिनिधी : जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण तर्फे प्रतिवर्षी आयोजित केली जाणारी “आपली फलटण मॅरेथॉन” यावर्षी दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५.३० वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे पार पडणार आहे. या मॅरेथॉनचा शुभारंभ दि. १ ऑगस्ट रोजी डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावर्षीची मॅरेथॉन ही “अवयवदानाला प्रोत्साहन (Support Organ Donation)” ही संकल्पना घेऊन होत असून, महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर प्रमुख पाहुण्या व ब्रँड ॲम्बेसेडर असतील.

विशेष आकर्षण

भारतामध्ये प्रथमच : गुडघा व खुब्याचे संधेरोपण झालेले १००० हून अधिक रुग्णांसाठी ३ कि.मी. “वॉकेथॉन”

फन रन : १२ वर्षाखालील लहान मुलांसाठी ३ कि.मी. अंतराची “हसत-खेळत बाल गट धाव”

वरिष्ठ नागरिक : ६५ वर्षांवरील सहभागींसाठी मोफत ३ कि.मी. वॉकेथॉन

२१ कि.मी. हाफ मॅरेथॉन प्रथमच यावर्षी आयोजित

स्पर्धेच्या गटवार श्रेणी

१. १८–३० वर्षे : जोशपूर्ण युवा

२. ३१–४५ वर्षे : सळसळती तरुणाई

३. ४६–६४ वर्षे : प्रगल्भ प्रौढ

(प्रत्येक गट २१ किमी, १० किमी किंवा ५ किमी धावू शकतो)

नोंदणी शुल्क

पुरुष : ₹७५०

महिला : ₹५००

मुले (१२–१८ वर्षे) : ₹३००

ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांवरील, ३ किमी रन) : मोफत

📍 नोंदणीची अंतिम तारीख : २० सप्टेंबर २०२५ (रात्री १२ वा.)

नोंदणी लिंक 👉 https://alpharacingsolution.com/e/apli-phaltan-marathon-2025

मॅरेथॉन किट

आकर्षक टी-शर्ट

टाइम चिपसह बिब

टोपी, एनर्जी बार, सरप्राईज गिफ्ट

प्रत्येक रनरला Finisher Medal 🏅 आणि ई-सर्टिफिकेट

बक्षिसे (पुरुष व महिला स्वतंत्र)

🥇 पहिले : ₹१०,०००

🥈 दुसरे : ₹७,०००

🥉 तिसरे : ₹५,०००

संपूर्ण मार्ग ऊसाची शेती, फळबागा आणि द्राक्षमळ्यातून जात असल्याने नयनरम्य वातावरणात ही मॅरेथॉन पार पडणार आहे. पूर्वी झुंबा वॉर्मअप व नंतर मनोरंजक कार्यक्रमही होणार आहेत.

“आपली फलटण मॅरेथॉन” ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून आरोग्यवर्धक मेळावा आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Post Views: 764 मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कराड(अली मुजावर )प्रतिनिधी

Live Cricket