ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शाळास्तरावर सहशालेय उपक्रम राबवावे :-जे जे जगताप
तांबवे:-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शाळास्तरावर सहशालेय उपक्रम राबविले जातात.स्वर्गीय ए.व्ही.पाटील अण्णांनी ग्रामीण भागात शाळा सुरू करुन बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले हे काम कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन वडगाव हवेलीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष जे.जे.जगताप यांनी केले.
वडगांव हवेली ता कराड येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय ए.व्ही.पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भित्तीपत्रक चे उद्घाटन वेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच राजेंद्र थोरात हे होते. यावेळी मुख्याध्यापक डी.पी.पवार,प्रभारी मुख्याध्यापिका व्ही.एच.कदम,ए.एल पाटील,
एम. डी.पाटील,एन.एस.कराळे,एम.एस पाटील,एस.एम.आवटी,एम.एस.सकटे, अश्विनी सांळुखे,प्रणिता जगताप, हणमंत पाटील,अब्दुल मुल्ला, शिवाजी चव्हाण यांची उपस्थिती होती.
राजेंद्र थोरात म्हणाले या विद्यालयात विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात.कै.ए.व्ही.पाटील सरांनी आमचे गावात शाळा सुरू करुन गरीब, कष्टकरी लोकांच्या मुलांना शिक्षणाचे दालन खुले केले.यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी अण्णां विषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत निवास पोळ व आभार अनिल लोकरे यांनी मानले.
