जेष्ठांच्या आरोग्यासाठी संजीवनीचा उपक्रम श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
सातारा – महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात जेष्ठ नागरिक संघातील सदस्यांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. विठ्ठलराव जाधव व माजी MECB अभियंता युवराज पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी साबळे सर, भोसले सर आदी मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने धन्वंतरी पूजन करून शिबिराचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमास संजीवनी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुधाकर बेंद्रे, डायरेक्टर डॉ. सुनीता पवार, डॉ. विशाल गावडे, डॉ. अनुजा वीरकर, एच.आर. अॅडमिन सलीम बागवान, भिकाजी देशमुख, अशोक कदम, स्टाफ नर्स धनश्री मुसळे, शारदा पवार, आशिता साळवे तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. सुनीता पवार यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्व अधोरेखित केले. प्रा. विठ्ठलराव जाधव व युवराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी उपस्थित मान्यवर व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृती घडून आली असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
