जीवनप्रकाश हॉस्पिटल अतिदक्षता विभाग रुग्णांना वरदान ठरेल : खा. नितिन पाटील
डॉ. मनोहर ससाणे यांनी कोरोना काळात त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर चालू केले. त्यावेळी त्यांनी रुग्णांची परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या लक्षात आले की आपल्याला अतिदक्षता विभाग चालू करायला हवा. कारण पाचवड पंचक्रोशीतील जनतेची गैरसोय होत आहे. जावली, वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा तालुक्याला पाचवड हे मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव आहे. तसेच महामार्गावर एक्सीडेंट होत असल्याने त्याची खूप आवश्यकता होती. पंचक्रोशीतील जनतेसाठी हा अतिदक्षता विभाग वरदान ठरेल असे प्रतिपादन खा. नितिन पाटील यांनी अतिदक्षता विभागाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी कैलास फूड्सचे संस्थापक उद्योजक श्री दत्तात्रय बांदल, पाचवडचे सरपंच श्री महेश गायकवाड, जेष्ठ नागरिक श्री अशोक गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. नितिन पाटील म्हणाले की डॉ मनोहर ससाणे हे गेली ४१ वर्षे अविरत वैद्यकीय सेवा देत आहेत ही सोपी गोष्ट नाही. बांधिलकी याला म्हणतात. डॉ मनोहर ससाणे यांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आत्तापर्यंत तर माझे सहकार्य राहिलेच आहे. पण इथून पुढील काळातही त्यांना लागेल ते सर्व सहकार्य निश्चितच करू असे खा. पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना दत्तात्रय बांदल म्हणाले की डॉ मनोहर ससाणे यांनी अतिदक्षता विभाग चालू करून या परिसरातील रुग्णांची होणारी गैरसोय दूर केली आहे. परिसरातील रुग्णांना त्याचा निश्चितच लाभ होईल. गंभीर परिस्थितीतील रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा आता पाचवडमध्ये उपलब्ध झाली आहे. त्यासाठी आता सातारा, वाईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
यावेळी बोलताना पाचवड गावचे सरपंच श्री महेश गायकवाड यांनी सांगितले की एवढे सुसज्ज हॉस्पिटल आणि एवढा सुसज्ज अतिदक्षता विभाग पाचवडमध्ये आहे याचा आम्हा पाचवडकरांना निश्चितच अभिमान आहे. येथील जनतेला याचा खूप फायदा होणार आहे. इथून पुढील काळातही डॉ मनोहर ससाणे यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करू.
यावेळी बोलताना डॉ मनोहर ससाणे यांनी सांगितले की पाचवड हे महामार्गालगतचे मोठे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातून इथे वर्दळ चालू असते. महामार्गावर छोटे-मोठे अपघात होत असतात. इतरही अनेक सिरिअस पेशंट येतात. त्यामुळे अतिदक्षता विभागाची नितांत गरज भासत होती. खूप वर्षे मी यावर विचार करत होतो. पण ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.
कोविडच्या साथीमध्ये कोविड सेंटर चालू केले. अनेक रुग्णांना बरे करून घरी पाठवले. एकही रुग्ण दगावला नाही. पण तेंव्हापासून अतिदक्षता विभाग किती महत्त्वाचा आहे हे पटले आणि काम चालू केले. आज खा. नितिन पाटील यांच्या शुभहस्ते त्याचे उद्घाटन होत आहे याचा मला आनंद आहे. काकांचे, आबांचे सहकार्य नेहमीच लाभले आहे. पाचवड आणि पंचक्रोशीतील जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
यावेळी रुलर हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असो. संस्थापक डॉ सुधाकर बेंद्रे, माजी अध्यक्ष डॉ शंतनु पवार, डायरेक्टर डॉ अनिल शिंगे, डॉ. माणिक जाधव, सचिव डॉ सचिन गुरव, डॉ विकास फरांदे, डॉ योगेश फरांदे, डॉ संजय नलावडे, डॉ अशोक भिसे, डॉ अमोल भोसेकर, डॉ स्नेहा जमदाडे, डॉ ओंकार इथापे, डॉ राजेंद्र माने, डॉ सौ रत्नप्रभा माने, डॉ अमोल गायकवाड, डॉ सतीश रहाटे, डॉ विलास परामणे, डॉ संग्राम देशमुख, डॉ निलेश कुचेकर, डॉ. संदीप थोरात, डॉ जयकुमार कटारिया तसेच पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी व डॉक्टर्स, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री किशोर बोराटे यांनी केले. आभार पाचवडचे जेष्ठ नागरिक श्री अशोक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हॉस्पिटलचे कर्मचारी श्री विजय तरडे, लक्ष्मण गायकवाड, समीर शेख, संजय चव्हाण, पुष्पा माने, सुवर्णा शिंदे, कांचन वने, पवार मावशी, सुनिल खिलारे यांनी कष्ट घेतले.
