Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात अग्नितांडव; सहा रुग्णांचा होरपळून मृत्यू

जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात अग्नितांडव; सहा रुग्णांचा होरपळून मृत्यू

जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात अग्नितांडव; सहा रुग्णांचा होरपळून मृत्यू

जयपूरच्या सवाई मान सिंह (SMS) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

राजस्थान- राजस्थानच्या जयपूरमधील सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

या घटनेमुळे राज्यस्थानमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या सहा रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket