जावलीचे सुपुत्र शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड; महाबळेश्वरमध्ये भव्य सत्कार सोहळा!.
महाबळेश्वर: जावली तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे. जावली तालुक्याचे सुपुत्र, साताऱ्याचे माजी पालकमंत्री आणि माजी जलसंपदा मंत्री मा. आ. श्री. शशिकांतजी शिंदे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे केवळ जावली तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाबळेश्वरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शशिकांत शिंदे यांच्या या महत्वपूर्ण निवडीबद्दल महाबळेश्वरकरांच्या वतीने सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल ड्रीम लँड, महाबळेश्वर येथे एका भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा. आ. श्री. रोहितदादा पवार भूषवणार आहेत. या प्रसंगी श्री. सुनील माने (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार), मा. श्री. राजेंद्र शेलार (सरचिटणीस, सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस) आणि मा. श्री. यशवंत घाडगे (जिल्हाप्रमुख, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांचे महाबळेश्वरमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये श्री. सुभाष कारंडे (महाबळेश्वर तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार), राजेश बंडूशेठ कुंभारदरे (माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), श्री. आशिष चोरगे (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी – शरद पवार), श्री. सचिन वागदरे (युवासेना जिल्हा उपाध्यक्ष), श्री. संतोष आप्पा जाधव (तालुका प्रमुख, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), श्री. विश्वनाथ दादा संकपाळ (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार, ज्येष्ठ नेते), श्री. किसन भिलारे (काँग्रेस ज्येष्ठ नेते), श्री. आप्पासाहेब साळुंखे (काँग्रेस ज्येष्ठ नेते), श्री. सलीम बागवान (महाबळेश्वर शहर अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस), श्री. शंकर पवार (महाबळेश्वर शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार), श्री. राजाभाऊ गुजर (महाबळेश्वर शहर अध्यक्ष, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सौ. राजश्री भिसे (जिल्हा संघटक, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महाबळेश्वर तालुका, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रीय काँग्रेस महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला महाबळेश्वरमधील तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. शशिकांत शिंदे यांच्या या निवडीमुळे “जावलीचा झेंडा” आता राज्यात फडकला असून, त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.





