जावली तालुक्यातील जनतेच्या प्रेमाने शशिकांत शिंदे भारावले
जावली, मेढा, केळघर, कुसुंबी, कुडाळ शशिकांत शिंदे साहेबांचा झंजावती दौरा
सातारा लोकसभा निवडणूक प्रचार निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतराव पाटील साहेब यांची कोपरा सभा केळघर ता.जावळी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या दिमाखात आणि कृषी संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी केलेल्या भव्य दिव्य स्वागताबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.
जयंतराव पाटील साहेबांनी उपस्थित तालुक्यातील आणि परिसरातील जनतेला संबोधित करत असताना विविध मुद्द्यांना जनतेसमोर मांडले. या देशात हुकुमशाही प्रवृत्ती बळकट होत आहे. आपल्या अधिकारांचे संकुचन होईल की काय अशी भीती निर्माण झाली. काही मुद्दे स्पष्ट बोलून केंद्र सरकारला उघडे पाडले जाईल, या भीतीने तुरुंगात घातलं जात आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातही दडपशाहीच राजकारण फोफावत आहे, याला आळा घालण्यासाठी सर्वसामान्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. ही निवडणूक आता सर्वसामान्यांनी हाती घेतली आहे याचा आवर्जून उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
आज देशात स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल, देशातील वंचित व दीनदलित लोकांचा आवाज जपण्यासाठी विरोधी पक्षांचा आवाज बुलंद केला पाहिजे. तरच देशात लोकशाही टिकेल. देशातील जनता ही महागाई, बेरोजगारी, विविध करांच्या जाचाने त्रस्त आहे. युवकांना बेरोजगार केले जात आहे. स्वाभिमानी सातारकर जनतेने विवेकबुद्धीने ‘ तुतारी फुंकणारा माणूस ‘ या चिन्ह समोरील बटन दाबून लोकशाही बळकट करूयात, असे उपस्थित परिसरातील जनतेला आवाहन केले.
प्रसंगी आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, भारत पाटणकर, सदाशिवराव सपकाळ, दीपकराव पवार, सारंग पाटील, बापूराव पार्टे, पार्टे गुरुजी, विश्वनाथ धनवडे, संतोष चव्हाण, नितीन गोळे, सुहास गिरी, मोहनदादा शिंदे, हेमंत शिंदे, समिंद्राताई जाधव, अतिश कदम, रूपाली भिसे, सुरेश गोळे, विठ्ठल गोळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.