जावली तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनची नूतन कार्यकारणीच्या निवडी बिनविरोध
केळघर प्रतिनिधी : जावली तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनची नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवडणूक होवून तालुकाध्यक्ष पदी ॲड राजेंद्र पोफळे यांची निवड झाली . याबद्दल त्यांचे व नुतन कार्यकारणीचे अनेकांनी अभिनंदन केले . जावली तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन मेढा यांची नवीन कार्यकारणी निवडणे बाबत नुकतीच बैठक झाली. नूतन कार्यकारणीबाबत विषय सभेमध्ये मांडण्यात आला. ठराव होऊन नवीन कार्यकारणी निवडणी बाबत सभासदांमध्ये विचारविनिमय होऊन नूतन कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्याचा ठराव संमत झाला. नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी ॲड.राजेंद्र पोफळे उपाध्यक्षपदी ॲड.विक्रमादित्य विधाते सचिव ॲड.अनुप लकडे खजिनदार ॲड.आरती शेटे-दुटाळ सदस्य ॲड. वृषाली गाढवे . ॲड.रजत पारंगे ॲड.निलम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे जावली तालुका बार असोसिएशनचे सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
