कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » प्रशासकीय » जनता दरबारास जनतेचा प्रचंड प्रतिसाद आ.मनोजदादा घोरपडे

जनता दरबारास जनतेचा प्रचंड प्रतिसाद आ.मनोजदादा घोरपडे

जनता दरबारास जनतेचा प्रचंड प्रतिसाद आ.मनोजदादा घोरपडे

हेळगावच्या जनता दरबार मध्ये 200 हून अधिक समस्यांचा निपटारा

तालुक्यातील उपस्थित जनतेकडून समाधान व्यक्त.

मसूर-कराड उत्तर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सुटाव्यात यासाठी जनता दरबारचा उपक्रम सुरू केला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सहकार्यातून कराड उत्तर मतदार संघात विकासचा उर्वरित बॅकलोग भरून काढणार असून लोकोपयोगी कामासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी दिली.

कराड तालुक्यातील हेळगाव येथे आयोजित जनता दरबारच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांत अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, आरटीओ सुदर्शन देवडे, उपनिबंध अपर्णा यादव, नायब तहसीलदार बाजीराव पाटील, श्री राठोड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, पुरवठा अधिकारी नायकवडी मॅडम, सपोनी आदिनाथ खरात, वीज वितरणच्या सौ जाधव मॅडम, एस.टी. पाटील, जलसंधारणचे श्री जगदाळे, एसटी महामंडळाचे श्री ठाणेकर,पोलीस निरीक्षक श्री जगताप आदीसह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार घोरपडे पुढे म्हणाले, सध्या राज्यात सर्वत्र सेवा पंधरवडा राबवला जात आहे. त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असून मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानामध्ये प्रत्येक गावाने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.

प्रांत अतुल म्हेत्रे म्हणाले, जनता दरबाराच्या माध्यमातून कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा निपटारा जागेवरच होऊ लागला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून शासनाच्या विविध योजना। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील मात्र लोकांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनेत सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी केले. गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. श्रीकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर अमर पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास शिवाजीराव जगदाळे, किसन पाटील, संजय पवार, सुभाष पाटील, धीरज जाधव, प्रदीप बानगुडे-पाटील, सरपंच मिलिंद पाटील, उपसरपंच शिवाजी चोरामले, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन कौस्तुभ सूर्यवंशी, व्हॉइस चेअरमन शिवाजी जगदाळे सर्वसांचालक, शरद घोलप, सागर जगदाळे, संजय शिरतोडे, दिनकर पाटील, पुरंदर जाधव, प्रशांत घोलप, वैभव इंगळे,अजय सुर्यवंशी, गणेश घाडगे, शिवम सूर्यवंशी, शेखर सूर्यवंशी, विकास गायकवाड, संभाजी वाघमारे, अनिकेत चव्हाण, शशिकांत शिंदे, ओंकार जगदाळे, विकास सूर्यवंशी, शांताराम मोरे, अभिजीत पाटील, विलास आरोठे, मारुती घोलप, शुभम चव्हाण, सुनील जाधव, मुरलीशेठ पोळ, प्रवीण घोलप आधीसह परिसरातील ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोनशेहून अधिक समस्यांचा निपटारा

 हेळगाव ता. कराड येथे झालेल्या जनता दरबारामध्ये कराड तालुक्यातील सुमारे दोनशेहून अधिक समस्यांचा निपटारा आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच करण्यात आला. तर उर्वरित समस्यासाठी सुमारे तीन तास या जनता दरबारला उपस्थित राहून स्वतः लक्ष घालत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी जनतेच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket