Home » राज्य » अंतिम टप्प्यातील दुष्काळमुक्तीच्या लढ्यात साथ द्या आ.जयकुमार गोरे

अंतिम टप्प्यातील दुष्काळमुक्तीच्या लढ्यात साथ द्या आ.जयकुमार गोरे 

अंतिम टप्प्यातील दुष्काळमुक्तीच्या लढ्यात साथ द्या आ.जयकुमार गोरे 

गट , तट बाजूला ठेवून भाजप महायुतीच्या पाठीशी रहा *

खटाव प्रतिनिधी : गेल्या १५ वर्षांपासून मी दुष्काळमुक्तीची लढाई लढत आलो आहे. उरमोडी, तारळी, जिहेकठापूर योजनांचे पाणी माण – खटावला आणले आहे. आता महत्वाकांक्षी टेंभू योजनेची कामे दोन्ही तालुक्यात सुरु झाल्याने दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. पाणीप्रश्नावरील माझी ही शेवटची निवडणूक आहे. शेतकरी, युवक, युवती आणि माता भगिनींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणाऱ्या भाजप महायुतीच्या पाठिशी राहून अंतिम टप्प्यात आलेल्या माझ्या दुष्काळमुक्तीच्या लढाईत साथ द्या अशी साद आ. जयकुमार गोरे यांनी मायणी गटातील गावभेटीदरम्यान घातली. 

      आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गावात जनतेने सांगितलेली विकासकामे मार्गी लावत आलो आहे. मायणी आणि कुकुडवाडसह ५२ गावांसाठी टेंभू योजनेची कामे सुरु झाली आहेत. दीड वर्षातच या भागात मंजूर झालेले अडिच टीएमसी पाणी येवून दुष्काळी कलंक कायमचा पुसला जाणार आहे. स्वप्नात नव्हती अशी मोठी कामे मार्गी लावून मतदारसंघातील दुष्काळाची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. आपल्या पाणीप्रश्नापेक्षा राजकारण मोठे नाही. थोड्याच कालावधीत दोन्ही तालुके दुष्काळमुक्त होतील तेव्हाच जयकुमार आमदार झाल्याचे सार्थक होईल. 

     आ. गोरे पुढे म्हणाले, बारामतीकरांच्या नाकीनऊ आणल्यानंतर माझ्यासमोर विरोधात उमेदवार निश्चित झाला आहे. त्यांचा खटावचा स्वाभिमान अचानक जागृत झाला आहे. या भागातील पाणी योजना रखडल्या होत्या, गावेच्या गावे विकासासाठी आसुसलेली होती,कोरोना काळात जनता तडफडत होती होती तेव्हा त्यांच्या स्वाभिमान कुठे गेला होता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. खटाव – माण असा दुजाभाव न करता विविध योजनांचे येणारे पाणी हा आमचा स्वाभिमान आहे. जलक्रांती होत असताना औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांतीचा आमचा संकल्प आहे. विरोधकांकडे मला रोखण्याशिवाय दुसरा कोणताच अजेंडा नसल्याने ते जनतेसमोर जाऊच शकत नाहीत असेही आ. गोरे शेवटी म्हणाले.  

जाती – पातीच्या राजकारणाला थारा नको ……

वेगवेगळ्या डीएनएचे सगळे विरोधक माझ्या विरोधात एकत्र आले आहेत. त्यांच्याकडे माण – खटावसाठी कोणतेच व्हिजन नाही. त्यांची तशी कुवतही नाही. सांगण्यासारखे काहीच नसल्याने त्यांना जनतेसमोर तोंड दाखवायला जागा नाही. कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी जातीपातीचे राजकारण सुरु केले आहे. जनता त्यांच्या अशा बुरसटलेल्या विचारांना आणि राजकारणाला आजिबात थारा देणार नाही. 

आ. जयकुमार गोरे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 61 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket