जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वाडेट्टीवर यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी केलेले आपमानास्पद वक्तव्याचा सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर नरेंद्र महाराजांचे शिष्य व अनुयायी यांनी जोरदार घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला
श्री संप्रदाय सातारा जिल्हा सेवा समिती यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांनी विजय वाडेट्टीवर यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीअनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला यावेळी सातारा जिल्हा सेवा समिती तसेच जिल्ह्यातील सर्व भक्त शिष्य अनुयायी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
महाराजांचा अवमान करणाऱ्या या भ्रष्ट आमदाराने माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली अन्यथा होणारी परिणाम हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असतील त्याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस पक्ष व भ्रष्ट आमदार विजय वाडेट्टीवर राहतील.
