महिलांनी आरोग्यविषयक जागरूक राहणे आवश्यक
डॉ. प्रियाताई महेश शिंदे
गौरीशंकर च्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महिला दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न , धावपळीच्या युगात मुलाबाळांचे संगोपन करताना महिला वर्गाला असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो .यामध्ये कुटुंबातील सर्व जबाबदारीचे ओझे ती आनंदाने पार पाडत असते हे जरी खरे असले तरी तिने स्वतःच्या निरोगी आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे असे मत डॉ . प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केले. भक्तवडी साताररोड ता. जि . सातारा . येथील यशोदीप मंगल कार्यालय येथे गौरीशंकर च्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या महिला दिन व सांस्कृतिक उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या . यावेळी स्कूलच्या प्राचार्या सविता नलवडे , भारती फाळके ,वर्षा जगदाळे , आशा चतुर ,कविता फाळके ,रूपाली जाधव ,कोमल नामदास ,तसेच पालक प्रतिनिधी डॉ . सदाशिव जाधव आदी प्रमुख उपस्थित होते .
डॉ .प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या की , “महिलावर्ग आज शिक्षणाने स्वयंभू झाला आहे .त्यामुळे त्या स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहेत .कुटुंबाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या नारी शक्तीने भारतीय संस्कृती व संस्काराचे जतन करून नव्या पिढीपुढे एक आदर्श ठेवला पाहिजे ” .
स्कूलच्या प्राचार्या सविता नलवडे म्हणाल्या की ‘ ” स्कूलच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये पालक वर्गाची साथ अनमोल लाभली आहे विशेषता महिलावर्ग आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती बाबत अधिक जागरूक असल्याचे आढळून येते. “प्रारंभी स्कूलच्या वतीने डॉ .प्रियाताई महेश शिंदे यांचे स्वागत प्राचार्या सविता नलवडे यांनी केले महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्याचे कलाविष्कार सादर करून रसिक मनाचे मने जिंकले .यावेळी कार्यक्रमाचे आभार राजश्री दिसले यांनी मानले .
शालेय स्तरावरील विविध उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप , उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक डॉ . अनिरुद्ध जगताप , जयवंतराव साळुंखे , आप्पा राजगे ,प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले .
