Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मेंढपाळाचा लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही अशाच कित्येक संघर्षमय गोष्टींचा साठा आहे. कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने युपीएससी क्रॅक करुन लाखो गरिब,  तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय. गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण तो बनलाय. बिरदेव सिद्धापा डोणे असं त्याचं नाव असून यूपीएससी परीक्षेत त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. वाड्या-वस्त्यावर, माळरानावर जाऊन शिकलेला बिरदेव आता देशसेवत आपलं योगदान देणार आहे. त्याच्या या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्याचा सत्कार, सन्मान केला जात आहे. एखाद्या तरुण नायकाची अशीच संघर्षगाथा बिरदेवची आहे. 

वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय. त्यामुळं लहानपण शेळ्या-मेंढ्यांच्या पाठीमागं फिरूनचं गेलं. शाळेत असताना पोरानं चुणूक दाखवली. दहावीच्या परीक्षेत मुरगूड केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. बारावीत असताना विज्ञान शाखेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण होऊन पुण्यात स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं. यानंतर अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजधानी दिल्ली गाठली. दोन प्रयत्नांत अपयश आलं. मात्र, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचे बिरदेव ढोणे यांनी यूपीएससीचं मैदान मारलं.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त

Post Views: 20 स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त सातारा| दिवंगत व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी स्वर श्रद्धांजलीच्या

Live Cricket