Home » जग » शिक्षणशिक्षण » आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्या शास्त्रज्ञ डॉ सुखात्मे यांची गौरीशंकर मध्ये जयंती साजरी विद्यार्थ्यांचा सहभाग

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्या शास्त्रज्ञ डॉ सुखात्मे यांची गौरीशंकर मध्ये जयंती साजरी विद्यार्थ्यांचा सहभाग

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्या शास्त्रज्ञ डॉ सुखात्मे यांची गौरीशंकर मध्ये जयंती साजरी विद्यार्थ्यांचा सहभाग.

लिंब- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्या शास्त्रज्ञ डॉ पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांची जयंती गौरीशंकरच्या डॉ पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ पी. व्ही. सुखात्मे यांनी संख्याशास्त्रात मोलाचे संशोधन केले सांख्यिकी सिद्धांत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती त्यांनी कृषी क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा लाभ भारतातील जनतेला दिला. अशा थोर संख्या शास्त्रज्ञ सुखात्मे यांचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील बुध या गावच्या भूमिपुत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीचा सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. प्रारंभी डॉ सुखात्मे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक उपक्रमाचे सादरीकरण केले. तसेच डॉ सुखात्मे यांच्या कार्याची विद्यार्थिनी संस्कृती मुसळे व हर्षदा तावरे हिने दिले. प्रास्ताविक व आभार शिक्षिका शैला शिंदे यांनी केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे– पालकमंत्री शंभूराज देसाई*  सातारा : बलशाली भारताच्या

Live Cricket