माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी रवींद्र येवले यांचे व्याख्यान प्रमोद शिंदे यांची माहिती
दि. २३/२/२०२४ : सातारा जिल्ह्यात पोलादी पुरूष म्हणुन ओळखले जाणारे किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन, सातारा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ग्रामीण साहित्यिक व वक्ते प्राचार्य रवींद्र येवले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची महिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, लक्ष्मणरावतात्या पाटील यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणे बोलणे ही त्यांची ख्याती होती. त्यामुळेच तात्यांची जिल्ह्यामध्ये पोलादी पुरूष म्हणून ओळख होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांलादेखील तात्यांनी ताकद दिल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये राज्य करणारा नेता होता. तात्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमठविलेला दिसून येतो. तात्यांच्या जाण्याने आम्हा कार्यकर्त्यांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली होती. ती पोकळी भरून काढण्याचे काम किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील करीत आहेत. स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त रविवार (दि. २५) रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर ग्रामीण साहित्यिक व वक्ते प्राचार्य रवींद्र येवले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील भुषवणार आहेत.
स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या व्याख्यानास कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.
स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांची जयंतीनिमित्त बोपेगावात रंगणार किर्तन
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त जन्मगावी म्हणजे बोपेगाव, ता. वाई येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकरिता सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह. भ. प. पारसमहाराज मुथा यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार असून सर्वांनी या किर्तनाचा आस्वाद घेण्याचे आवाहनही बोपेगांव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
