Home » देश » प्रभाग क्रं.19 मध्ये सौ.हेमलता भोसले यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

प्रभाग क्रं.19 मध्ये सौ.हेमलता भोसले यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

प्रभाग क्रं.19 मध्ये सौ.हेमलता भोसले यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

सातारा  प्रतिनिधी-सातारा नगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर शाहूनगर प्रथमच निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रं.19 मधून भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ. हेमलता सागर भोसले यांना प्रभागातील मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. पदयात्रा, कोपरासभा, मतदारांशी संवाद साधताना सौ.भोसले यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सौ. हेमलता भोसले यांना शाहूनगरच्या पहिल्या महिला नगरसेवक होण्याचा बहुमान मिळवून देण्याचा निर्धार नागरिकांनी केल्याचे चित्र प्रभाग क्रं.19 मध्ये आहे. 

 

युवा उद्योजक सागर भोसले यांच्या माध्यमातून सौ. हेमलता भोसले यांच्या साथीने शाहूनगर परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले आहेत. निवडणुक जाहीर झाल्यानंतर ऐन प्रचाराच्या धामधुमीत सागर भोसले यांच्या मातोश्रीचे निधन झाले परंतु समाजासाठी नेहमी कार्यरत राहयचे हे बाळकडू मिळालेल्या सागर भोसले आणि उमेदवार सौ.हेमलता भोसले यांनी दु:खद प्रसंगातून सावरत प्रचाराला सुरुवात केली. प्रभागातून पदयात्रा, कोपरा सभा, विविध मंडळाच्या बैठका, विविध कॉलनी, अपार्टमेंटमधील मतदारांशी संवाद साधला. या निवडणुकीत तुमच्या सर्वांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी तिथे जाणार आहे. या परिसरासाठी कोणतीही सत्तास्थाने नसताना आजपर्यंत विविध उपक्रम, कामे केली आहेत त्याला तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता सत्तेच्या माध्मयातून या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला निवडून द्यावे ही भूमिका मतदारांसमोर मांडली, त्याला मतदारांनी, सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

युवा उद्योजक सागर भोसले यांनी सामाजिक कार्य करत असताना नेहमीच युवा, ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा मिळला आहे. तोच पाठिंबा परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सौ. हेमलता भोसले यांना मतदान करुन देण्याचे आवाहन केले. त्यालाही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना सौ. हेमलता भोसले यांनी भोसले कुटुंबांने नेहमीच सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटवला आहे. परिसरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी युवा उद्योजक सागर भोसले यांच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे.

दोन्ही महाराजांच्या साथीने या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येत्या दि.2 डिसेंबर महिला, युवा वर्ग, ज्येष्ठांनी भाजपाच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावे. या परिसराची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. त्यामुळे प्रभाग क्रं.१९ मधील मतदारांनी सौ. हेमलता भोसले यांना शाहूनगर मधील पहिला नगरसेवक होण्याचा बहुमान देण्याचा निर्धार केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 43 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket