श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्र व सोलर प्लांटचे लोकार्पण
फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील महत्त्वाची आणि विकासाच्या वाटेवर वेगाने धावणारी ग्रामपंचायत कोळकी येथे आज विकासाचा एक सुवर्णक्षण साजरा झाला. १५ वा वित्त आयोग आणि ग्रामनिधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर जलशुद्धीकरण केंद्र’ आणि ‘सोलर प्लांट’ यांचा भव्य लोकार्पण सोहळा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात पार पडला.
शुद्ध पाणी आणि सौर ऊर्जेचा संगम
कोळकी ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना आता शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच, ग्रामपंचायतीचा विजेचा खर्च वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सोलर प्लांटमुळे कोळकी ग्रामपंचायत आता ‘ऊर्जा स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
लोकार्पण सोहळ्याचा उत्साह
या सोहळ्याला श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी कोळकी ग्रामपंचायतीने राबवलेल्या या लोकोपयोगी उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले, याप्रसंगी कोळकी गावातील ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“ग्रामविकासासाठी निधीचा योग्य विनियोग कसा करावा, याचे उत्तम उदाहरण कोळकी ग्रामपंचायतीने घालून दिले आहे. शुद्ध पाणी आणि सौर ऊर्जा या आजच्या काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी केले.
ठळक वैशिष्ट्येः
निधी: 15 वा वित्त आयोग आणि ग्रामनिधीचा प्रभावी वापर,आरोग्यः जलशुद्धीकरण केंद्रामुळे जलजन्य आजारांना चाप बसणार.
बचतः सोलर प्लांटमुळे ग्रामपंचायतीच्या वीज बिलात मोठी कपात होणार.या उपक्रमामुळे कोळकी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण तालुक्यात या विकासकामाची चर्चा होत आहे.




