Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बिलीमोरिया “आरंभ” महोत्सवाचे उद्घाटन ; भारतातील नामांकित विद्यापीठे सहभागी होणार

बिलीमोरिया “आरंभ” महोत्सवाचे उद्घाटन ; भारतातील नामांकित विद्यापीठे सहभागी होणार

बिलीमोरिया “आरंभ” महोत्सवाचे उद्घाटन ; भारतातील नामांकित विद्यापीठे सहभागी होणार

पाचगणी : नाविण्यपूर्ण कृतिशील शैक्षणिक उपक्रमांतर्गत कलेतून ज्ञानप्राप्ती या उद्दिष्टाला केंद्रस्थानी ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या पाचगणीतील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’ या भव्य शैक्षणिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आज मोठ्या दिमाखात उद्घाटन अदिती एज्युकेशनचे संस्थापक चेअरमन अरुणभाई गोराडिया, संचालिका अदिती गोराडिया, पीयूष कामदार, यांच्या हस्ते करण्यात आले.

बिलीमोरिया हायस्कूलच्या ग्राऊंडवर २३ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या शैक्षणिक फेस्टिव्हलचा प्रारंभ झाला. यावेळी शाळेचे प्रिन्सिपॉल विशाल कानडे उपस्थित होते. प्रथमतः शैक्षणिक महोत्सवात उपस्थित राहणाऱ्या पालकांच्यासाठी उत्कृष्ट ड्रमवाद्यांतूंन कार्यक्रमाचे मनोरंजन झाले. तर या उपस्थित राहणाऱ्या परिसरातील शाळा तसेच विद्यार्थ्यांच्या पालक अन्य शालेय विद्यार्थी यांच्या दिमतीस अनेक प्रकारचे पन्नास स्टॉल लागले आहेत.व्यामध्ये साहसी खेळ, भारतीय संस्कृतीचे दर्शन मिळणार आहे. वेगवेगळ्या खाद्याच्या डिशेस मेजवानी म्हणून उपलब्ध होणार आहेत

तीन दिवस चालणाऱ्या शैक्षणिक “आरंभ” महोत्सवात अनेक कार्यक्रमाची रेलचेल होणार आहे. यामध्ये सांस्कृतिक, क्रीडा, तसेच विद्यार्थ्यांचे सादरीकरण असे कार्यक्रम साजरे होणार आहेत. हा महोत्सव , २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या मैदानावर पार पडणार असून, या फेस्टिव्हलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अदिती एज्युकेश संचलित बिलीमोरिया शाळेच्या संचालिका अदिती गोरडिया यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे या वर्षीच्या ‘आरंभ’ महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील नामांकित विद्यापीठांचा सहभाग. या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, उच्च शिक्षणाच्या संधी आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. 

पाचगणी : येथील बिलीमोरिया हायस्कूलच्या ग्राऊंडवर महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी गोराडीया, अदिती गोराडीया, पीयूष कामदार.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket