महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांवर घेतलेल्या हरकतींवर मा.जिल्हा न्यायालय वाई येथे २९ नोव्हेंबर ला होणार अंतिम निकाल
उमेदवारांचे अर्ज राहणार ? की बाद होणार ? याकडे संपुर्ण महाबळेश्वरवासीयांचे लक्ष .
महाबळेश्वर दि २५-११ महाबळेश्वर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छाननी प्रक्रियेवेळी गिरिस्थान नगर विकास आघाडी (नियोजित) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील लक्ष्मण शिंदे,माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्यावर तसेच काही प्रभागातील उमेदवारांनी देखील आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारां च्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी सुनावणी घेत या सर्व हरकती निकाल देताना फेटाळल्या होत्या
या निकाला विरुद्ध कुमार शिंदे यांच्यासह इतर हरकतदारांनी मा.न्यायालयात दाद मागितली मंगळवारी मा न्यायालयात सुनावणी पार पडली .अपिलकर्त्याच्या वकिलांनी या उमेदवारांनी नगरपरिषदेचा कर बुडवले बाबत ठोस पुरावे देत जोरदार युक्तीवाद केला व येत्या २९ नोव्हेंबर ला न्यायालय अंतिम निकाल देणार असून या सुनावणी कडे संपूर्ण महाबळेश्वर वासियांचे लक्ष लागले असून उमेदवारांमध्ये धाकधूक चांगलीच वाढली आहे
महाबळेश्वर पालिका निवडणूक प्रक्रिये वेळी छाननी प्रक्रिये दरम्यान गिरिस्थान नगरविकास आघाडी (नियोजित) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील लक्ष्मण शिंदे,लोकमित्र जनसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांच्याविरुद्ध प्लेक्स बोर्ड जाहिरात कर बाकी असल्याबाबतची लेखी तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांच्याकडे करून त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकत घेतली यासह प्रभाग क्र ०१ ब च्या उमेदवार प्रियांका अजित बावळेकर यांनी विद्या शरद बावळेकर यांच्या विरोधात प्लेक्स बोर्ड जाहिरात कर बाकी असल्याबाबत लेखी तक्रार करून हरकती घेतली होती व प्रभाग ०६ ब चे उमेदवार राहुल अशोक भोसले यांनी देखील संतोष बबन शिंदे यांच्या अर्जावर हरकत घेतली या दाखल सर्व हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के निवडणूक निरीक्षक श्रीमती पल्लवी निर्मळ व सहा. निवडणुक निर्णय अधिकारी योगेश पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पाडलीम निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी निकाल देताना या सर्व हरकती फेटाळल्या या निकालाविरुद्ध कुमार शिंदे यांच्यासह इतर उमेदवारांनी मा न्यायालयात दाद मागितली आज याबाबतची सुनावणी संपन्न झाली व येत्या २९ नोव्हेंबर ला मा न्यायालय अंतिम निकाल देणार आहे कुमार शिंदे यांच्यावतीने ऍड राजेंद्र साळुंखे -किवळकर हे काम पाहत आहेत
आता २९ नोव्हेंबर ला मा न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीसह निकालाकडे महाबळेश्वरवासीयांचे लक्ष लागले असून या उमेदवारांचे अर्ज राहणार ? की बाद होणार ? हे पुढील दोन दिवसात समजेल या निकालावर नगराध्यक्ष पदाच्या दोन्ही प्रमुख उमेदवर व राष्ट्रवादीचे दोन प्रभागातील उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे




