Home » Uncategorized » प्रभाग ९ मध्ये सेवेचा वसा पुन्हा एकदा जपण्यासाठी सज्ज सौ. सरोज किशोर कांबळे रणांगणात!

प्रभाग ९ मध्ये सेवेचा वसा पुन्हा एकदा जपण्यासाठी सज्ज सौ. सरोज किशोर कांबळे रणांगणात!

प्रभाग ९ मध्ये सेवेचा वसा पुन्हा एकदा जपण्यासाठी सज्ज सौ. सरोज किशोर कांबळे रणांगणात!

पांचगणी -सिद्धार्थनगर वसाहतीच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे, प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे आदरणीय माजी नगरसेवक कालकथित शंकर सोनू कांबळे यांच्या सेवाभावी परंपरेचा वारसा पुढे नेत, त्यांच्या उच्चशिक्षित सुनबाई सौ. सरोज किशोर कांबळे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक ०९ च्या विकासासाठी ठामपणे मैदानात उतरल्या आहेत.

त्यांचे ध्येय स्पष्ट—जनसेवेचा वसा अखंड पुढे नेण्यासाठी, प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समर्पित प्रयत्न!

सेवेची परंपरा, घराण्याची निष्ठा

सिद्धार्थनगरच्या विकासाचा पाया रचणारे शंकर सोनू कांबळे यांनी समाजकार्यातून गोरगरिबांसाठी केलेली सेवा आजही आदर्श मानली जाते. बेल-एअर हॉस्पिटलमधील त्यांच्या कार्यकाळात अनेकांना रोजगार मिळवून देणे, रुग्णांना मदत, वसाहतीचा विकास—यामुळे त्यांचा गौरव टाइम्स ऑफ इंडियानेही केला होता.या सेवाभावी परंपरेला पुढे नेत, त्यांचे सुपुत्र राजेश्वर, शरद, किशोर आणि संपूर्ण कांबळे कुटुंब आजही समाजकार्यात सक्रिय आहे. त्याच परंपरेचा कित्ता गिरवत, सौ. सरोज कांबळे राजकारणात सक्रिय आहेत.

अनुभव, शिक्षण आणि समाजसेवेची तळमळ

सन २०११ साली सर्वसाधारण जागेवरून नगरसेविका म्हणून विजयी ठरलेल्या सौ. कांबळे यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा वेगाने उभारून प्रभागात विकासाची गती वाढवली होती.त्या पदवीधर असून कायद्याचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे.

त्या स्वतः सिद्धार्थनगरच्या रहिवासी असल्याने मतदारांच्या प्रत्येक अडचणीची त्यांना खरी जाण आहे.पती किशोर कांबळे यांच्या २५ वर्षांच्या अनुभवातून कामगार चळवळ, आंदोलनं आणि प्रभागातील जनआंदोलनात त्यांचे कुटुंब खंबीर उभे राहिले आहे.

“सिद्धार्थनगरचा प्रत्येक मतदार माझा परिवार आहे,” असे त्या अंतःकरणातून सांगतात.

प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ठोस रूपरेषा

✔ अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण

✔ पाण्याच्या कायमस्वरूपी समस्येचे निराकरण

✔ आरोग्य सेवांची प्रभावी उभारणी

✔ ड्रेनेज समस्यांचे समाधान

✔ महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगारासाठी उपक्रम

✔ सिद्धार्थनगरचा गावठाण म्हणून समावेश करण्यासाठी पुढाकार

✔ अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्याची ग्वाही

सर्वसामान्य लोकांची कामे प्राधान्याने करणाऱ्या सरोज कांबळे यांनी प्रभागातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होत आपल्या सेवाभावाची परंपरा कायम ठेवली आहे.

जनतेचा पुन्हा विश्वास, कांबळे परिवाराचा सदैव पाठिंबा

सिद्धार्थनगरमध्ये रोजच्या जीवनातील समस्यांपासून सार्वजनिक कामांपर्यंत, प्रत्येक प्रश्नात सरोज कांबळे यांनी लोकांसाठी भक्कमपणे उभे राहण्याचा इतिहास आहे. त्यामुळेच प्रभागातील मतदार पुन्हा एकदा त्यांच्यावरील विश्वास दृढ करत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket