Home » राजकारण » माझा शाहूनगरच्या नागरिकांवर विश्वास : सौ. हेमलता सागर भोसले

माझा शाहूनगरच्या नागरिकांवर विश्वास : सौ. हेमलता सागर भोसले 

माझा शाहूनगरच्या नागरिकांवर विश्वास : सौ. हेमलता सागर भोसले 

सातारा – माझा शाहूनगरच्या नागरिकांवर विश्वास आहे. कोणतीही सत्तास्थाने नसताना आजपर्यंत परिसरात विविध कामे केली. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्या सेवेची परतफेड म्हणून प्रभाग क्रं.१९ मधील मतदार मला नक्कीच विजयी करतील, असा विश्वास प्रभाग क्रं.१९ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार सौ. हेमलता सागर भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी युवा उद्योजक सागरशेठ भोसले, प्रभाग क्रं.१९ मधील भाजपाचे उमदेवार सुशांत महाजन उपस्थित होते. 

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरु असून प्रभाग क्रं.१९ मधील अधिकृत उमेदवार सौ. हेमलता सागर भोसले, सुशांत महाजन यांनी मतदारांच्या गाठीभेटी, पदयात्रा, कोपरा सभा यावर भर दिला आहे. यावेळी बोलताना सौ. हेमलता भोसले म्हणाल्या, आजपर्यंत स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धा, स्वच्छ माझे अंगण, सुंदर माझी रांगोळी स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा रंगपंचमी दिवशी रंगोत्सव, फुटबॉल स्पर्धा, आरोग्य शिबिर, वयोवंदना कार्ड शिबिर, आधार अपडेट शिबिर, सीसीटीव्ही बसवणे, लाठी काठी प्रशिक्षण शिबिर, कराटे प्रशिक्षण शिबिर, केक बनविणे शिबिर, मधुमेह तपासणी शिबिर, मोफत रक्त तपासणी, महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिर, नेत्र चिकित्सा व अल्प दरात चष्मे वाटप शिबिर, कर्तुत्ववान महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, डिजिटल क्लासरूम, दिव्यांगांना व्हील चेअर वॉकर चे वाटप, पाणी बचतीसाठी मोफत नळ दुरुस्ती, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, न्यू होम मिनिस्टर, हळदी कुंकू समारंभ, स्वच्छता मोहीम, पाणी समस्या विषयी निवेदन, आंदोलन, व निराकरणासाठी प्रयत्न, विविध कॉलनीमधील गटर्स करण्यासाठी प्रयत्न, नादुरुस्त रस्त्यांसाठी नगरपालिकेमार्फत व खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामार्फत प्रयत्न पथदिवे बसवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. समाजातील सर्व वयोगटासाठी उपक्रम तसेच त्यांच्या समस्या, अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत केलेल्या या सेवेची परतफेड मतदार मला मतदान करुन विजयी नक्की करतील असा विश्वासही सौ. हेमलता भोसले यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 38 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket