रोहीणी चंद्रकांत माजगांवकर यांचे निधन
सातारा :- येथील जेष्ठ नागरीक सौ. रोहीणी चंद्रकांत माजगांवकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वार्धक्याने दि २६ सप्टेंबर रोज़ी निधन झाले. सौ. रोहीणी चंद्रकांत माजगांवकर या येथील प्रसिद्ध माजगांवकर घराण्याच्या स्नूषा, आणि सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, क्रीडा प्रेमी, अनेक सामाजिक संस्था आणि उपक्रमांचे आधारस्तंभ असलेले श्री. चंद्रकांत माजगांवकर यांच्या सुविद्य पत्नी होत. त्यांचा देखील साताऱ्यातील सामाजिक वर्तुळात आणि कार्यात सक्रिय सहभाग होता. त्या स्वतः उत्कृष्ठ बॅडमिंटनपटू होत्या.
त्यांच्यामागे पती, बॅडमिंटनपटू कन्या माधुरी, लेक प्रसाद आणि महेश तसेच सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.अंत्य संस्कार प्रसंगी माहुली येथे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा इ क्षेत्रातील अनेक नागरीक उपस्थित होते. दशक्रिया विधी रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता माहुली येथे होणार आहे.
