Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राजा के खिलाफ कैसे बात करेंगे’ भुजबळांचा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना चिमटा

राजा के खिलाफ कैसे बात करेंगे’ भुजबळांचा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना चिमटा

राजा के खिलाफ कैसे बात करेंगे’ भुजबळांचा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना चिमटा

खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली होती, प्रतापसिंह महाराज यांनी आपल्याच राजवाड्यामध्ये स्त्रींयासाठी पहिली शाळा सुरू केली, त्यांचं अनुकरण महात्मा फुले यांनी केलं असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उदयनराजे यांना खोचक टेला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

आज पुणे येथे महात्मा फुले यांच्या वाड्यावर जाऊन अभिवादन केले, माझ्यासोबत चंद्रकांत पाटील देखील होते. सर्वच राजकीय मंडळी होती. आज आपण बघतोय, मोठ्या उत्साहात नाशिक येथे मिरवणूक निघाली आहे. मी जे काही वाचल आहे, त्याआधारे महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा ही थॉमस पेन आणि इतर जे जगातील फिलॉसॉफर्स आहेत त्याची पुस्तक वाचून मिळाली आहे. ‘उदयनराजे तो राजा है हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेगे भाई’ असं म्हणत भुजबळ यांनी उदयनराजे यांना खोचक टोला लगावला आहे.

पुढे बोलातना ते म्हणाले की, पण मला एक माहिती आहे, पूर्वीचे राजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच शिकण्याची व्यवस्था करत होते. सार्वजनिक रित्या नाही. १८५१ साली सार्वजनिक शाळा ब्रिटिशांकडे सुपूर्त करण्यात आली, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

Post Views: 35 तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे खटावचे सनशाईन स्कूल ठरले जिल्ह्यातील पहिले रोबोटिक

Live Cricket