हॉटेल, दुकाने, सिनेमागृह आता 24 तास खुली राहणार
मुंबई – राज्यातील दुकानं, मॉल, हॉटेल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि इतर आस्थापनं आता 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांनी नाइल लाइफची संकल्पना मांडली होती. मात्र त्यावेळी भाजपकडून यावर टीका करण्यात आली होती.
आता मात्र भाजप सरकारकडून नाइट लाइफचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यानुसार, आठवड्यातील सर्व दिवस आस्थापनं सुरू ठेवता येणार आहे.
राज्य सरकारने आस्थापनांना 24 तास खुली राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र याचवेळी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबतही विशेष निर्णय घेण्यात आला आहे. आस्थापनांना आठवड्यातील प्रत्येक दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सलग 24 तासांची आठवड्याची सुट्टी देणं बंधनकारक असनार आहे.
हॉटेल
सिनेमागृह
नाट्यगृह
निवासी हॉटेल
मनोरंजनासंदर्भातील आस्थापनं
सर्व दुकाने चालू रहाणार
