महाबळेश्वर कचरा डेपोची भयावह स्थिती उघड – विलगीकरण थांबले, कचऱ्याचे डोंगर वाढले; प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
महाबळेश्वर- महाबळेश्वर कचरा डेपोची भयानक परिस्थिती, शहरातून विलगीकरण करुन जमा केलेला कचऱ्याची डेपोमध्ये विलगीकरण करण्याऐवजी एकत्रीकरण करुन कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे. विलगीकरण व विल्हेवाट लावण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराने काय काम केले व प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे अक्षम्य दुर्लक्ष.
महाबळेश्वर येथे शहरातील सर्व कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट येथील तापोळा रस्त्यानजीक असलेल्या कारवी आळा परिसरातील कचरा डेपोमध्ये लावली जाते. वर्षानुवर्षे येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी उभारलेली यंत्रसामग्रीचे भंगारात रुपांतरीत झाले असून येथे विलगीकरणाचे शेड देखील गायब झालेले दिसून आले. मोठ्या इमारतीचे काम येथे कधीकाळी सुरू करण्यात आले होते. परंतू सध्या याचे काम बंदच असून परिसरात अनेक सिमेंट पोत्यांचे दगड झाले असून पालिकेचे नेमके चाललंय तरी काय असा प्रश्न परिसरात फेरफटका मारताना दिसून आला.

मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, पाळीव गाय म्हशींची खाद्यासाठी या कचरा डेपोत वावर तसेच अनेक ठिकाणी नुकतेच तयार करण्यात आलेले बांधकाम केलेले संरक्षक भिंत तुटून काही ठिकाणी कचरा हा वन हद्दीत पसरत चालला असून त्यामुळे येथील नागरिकांच्या, वन श्वापदांचा व पाळीव जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना लक्षात येऊन सुध्दा अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष का होत आहे याबाबत अधिकाऱ्यांकडून खुलासा होणे गरजेचा आहे.
संपूर्ण शहरातील हालचाली टिपण्यासाठी व रेकॉर्ड करण्यासाठी अनेक ठिकाणी पालिका प्रशासनाने सि.सि.टि.व्ही लावले आहेत परंतू स्वतःच्या आस्थापनेवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतिही यंत्रणा कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले असून येथे काम करणारा एकमेव पोकलेन किती तास दिवसातून काम करतो व नेमके याचे बिल कोणत्या निकषांवर काढले जाते याबाबत प्रशासनाकडून खुलासा होणे आवश्यक आहे.




