Post Views: 57
पाचगणी प्रतिनिधी – पाचगणी शहरात रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांना प्रचंड प्रमाणात याचा त्रास होत आहे. त्याचबरोबर पाचगणी शहरातील पार्किंग समस्या वरती ही उपायोजना करण्यात यावी याकरिता माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ, सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे, इमरान क्षीरसागर व कार्यकर्त्यांनी पाचगणी मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांना दिले निवेदन. यावेळी कार्यक्षम अधिकारी निखिल जाधव यांनी येत्या आठ दिवसात प्रशासनाकडून योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे म्हणाले पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव अनेक समस्यांचा निपटारा जागीच करत असून. पाचगणी करांना त्यांचा अभिमान आहे. पाचगणी नगरपालिकेस कर्तव्यदक्ष व कार्यक्षम, आदर्श मुख्याधिकारी लाभलेले आहेत.
