Home » Uncategorized » निधन वार्ता » ज्ञानयोगी शिवाजीराव जगताप यांच्या निधनाने गौरीशंकर परिवारावर दुःखाची सावट.गौरीशंकर परिवाराचा आधारवड हरपला.

ज्ञानयोगी शिवाजीराव जगताप यांच्या निधनाने गौरीशंकर परिवारावर दुःखाची सावट.गौरीशंकर परिवाराचा आधारवड हरपला.

ज्ञानयोगी शिवाजीराव जगताप यांच्या निधनाने गौरीशंकर परिवारावर दुःखाची सावट.गौरीशंकर परिवाराचा आधारवड हरपला.

लिंब-गौरीशंकर नॉलेज सिटी चे अध्यक्ष मदनराव जगताप व उपाध्यक्ष मिलिंद जगताप यांचे वडील शिवाजीराव जगताप यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने गौरीशंकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दादा म्हणून ओळखले जाणारे शिवाजीराव जगताप हे ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व होते.सर्वांशी आदरपूर्वक वागणारे शिवाजीराव जगताप यांच्या दुःखद निधनाने खटाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.संस्कार व संस्कृतीचे ते चालते बोलते विद्यापीठच होते. अध्यात्मिकतेची विशेष आवड असणारे शिवाजीराव जगताप यांनी धार्मिक क्षेत्रात मोठे काम केले आहे.एक हाडाचे शिक्षक म्हणून संपूर्ण खटाव पंचक्रोशीत त्यांना ओळखले जात होते.चाळीस वर्षाहून अधिक काळ शिक्षकीपेशामध्ये काम करणारे शिवाजीराव जगताप यांनी असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्नतेने घडविले आहे.त्यांच्या ज्ञानाच्या आधारे असंख्य विद्यार्थी आज उच्च पदावरती कार्यरत आहेत.शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी शिवाजीराव जगताप यांनी आपले आयुष्य संपूर्णपणे शैक्षणिक कार्याला वाहिले.संस्कार संस्कृती व भारतीय परंपरेला साजेसे असे संस्कार विद्यार्थ्यांवर घडवणारे शिवाजीराव जगताप हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण खटाव पंचक्रोशीत ओळखले जात होते.ज्ञानाने समाज घडवण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे शिवाजीराव जगताप यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या विकासात्मक प्रगती बाबत जागृत राहुन आपले कार्य केले.स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात शिक्षणाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता याबाबत ग्रामीण भागातील समाज घटकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करून शिक्षणाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

ज्ञानयोगी शिवाजीराव जगताप यांनी असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञान अमृताची गोडी लावून घडवले आहे.विशेषता बहुजन समाजातील मुले व मुली यांना शिक्षणाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता हे पटवून देऊन त्यांना ज्ञान संस्काराने घडवले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले होते.जुन्या काळातील मराठी या विषयामध्ये एम ए पदवी प्राप्त असणारे शिवाजीराव जगताप यांना त्या काळात असंख्य नोकरीचे संधी उपलब्ध असतानाही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याचा निर्धार केला.अर्थात समाज परिवर्तनासाठी शिक्षण क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे असल्याने त्यांनी त्या काळात हा निर्णय घेतला.एम ए मराठी या विषयातील जरी पदवी प्राप्त केली असली तरी त्यांचे इंग्रजी भाषेवरती विशेष प्रभुत्व राहिले होते.असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान देऊन घडविले आहे. गणित, सायन्स त्याचप्रमाणे संस्कृत या विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व राहिले आहे.एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण पंचक्रोशी ओळख असणारे शिवाजीराव जगताप यांच्या दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाल्याने संपूर्ण खटाव पंचक्रोशीत व गौरीशंकर परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

वयाच्या ९६ वर्षापर्यंत ते ज्ञानाचा ध्यास घेऊन अखंडपणे जगले.अनेकांना ज्ञानसंपन्नतेने घडवणारे शिवाजीराव जगताप आज आपल्यामध्ये नाहीत, याचे दुःख आता नेहमीच जाणवणार आहे.गावकुसा बाहेर पालामध्ये राहणाऱ्या वंचित व दिनदुबळ्या घटकातील समाज बांधवांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे शिवाजीराव जगताप यांनी या समाज बांधवांमध्ये शिक्षणाचे कवाडे ज्ञान प्रकाशाचा दिवा लावून या समाज घटकाचे जीवनमान प्रकाशमय केलेले होते.जातीव्यवस्थेला मूठ माती देत असंख्य दिन दुबळ्या घटकांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामील करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या शिवाजीराव जगताप यांनी वयाच्या ९० व्या वर्षी कोरोना सारख्या महामारी रोगावर मात केली होती. वयाच्या ९६ वर्षी जगाचा निरोप घेता ना हि सर्वांशी ऋणानुबंध जपणारे दादा आज आपल्यात नाहीत ही कल्पनाही मनाला शिवत नाही. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

श्रीरंग काटेकर,जनसंपर्क अधिकारी,गौरीशंकर नॉलेज सिटी,सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 119 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket