लोकविराज प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा व बक्षीस वितरण समारंभ
वाई : वाई येथे होणाऱ्या लोक विराज प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा व बक्षीस वितरण समारंभाचे रविवारी दि.10 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.
लोकविराज प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण मार्गदर्शन मेळावा व भव्य गौरी-गणपती देखावा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. १० रोजी सकाळी सोनजाईनगर येथील मधुरा गार्डन येथे आयोजित केला आहे. शैक्षणिक, सामाजिक आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या लोकविराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तरी जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन लोक विराज प्रतिष्ठानचे संस्थापक विराज भैय्या शिंदे व पंचायत समितीच्या माजी सदस्य ऋतुजाताई विराज शिंदे यांनी केले आहे. या मेळाव्याला राजगड ज्ञानपीठच्या सचिव सौ. स्वरूपाताई संग्रामदादा थोपटे या उपस्थित राहणार आहेत.
