Post Views: 124
वाढता लोकसमर्थनाचा महापूर; सुनील बगाडे
पांचगणी -पाचगणी नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार सुनील बगाडे यांना जनसमर्थनाचा प्रचंड ओघ मिळत असून शहरातील प्रत्येक घटकातून त्यांना ठोस पाठिंबा मिळताना दिसत आहे. सर्वसामान्य जनतेचा युवा नायक, उच्चशिक्षित आणि विकासाची स्पष्ट दृष्टी घेऊन पुढे येणारा आश्वासक नेतृत्वाचा चेहरा म्हणून पाचगणीकर नागरिक त्यांच्याकडे पाहत आहेत. ज्येष्ठांपासून युवा वर्गापर्यंत सर्वांना त्यांच्या उमेदवारीने उत्साह मिळाला आहे.
नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत सुनील बगाडे यांचे नाव ठळकपणे आघाडीवर आहे. बगाडे कुटुंबाची निस्वार्थ समाजसेवेची परंपरा, शहरातील विश्वासार्ह प्रतिमा आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टीकोन यामुळे ते पाचगणीतील लोकप्रिय उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.




