Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महापुरूष महात्मा ज्योतिबा फुले जयंती विशेष लेख

महापुरूष महात्मा ज्योतिबा फुले जयंती विशेष लेख

महापुरूष महात्मा ज्योतिबा फुले जयंती विशेष लेख

सातारा (अली मुजावर )आज ११ एप्रिल २०२३. आज भारतीय इतिहासातले थोर महापुरूष महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुण्यात झाला. तिथेच त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. समाजाला शिक्षित केल्याशिवाय समाजातून जातीव्यवस्था किंवा भेदाभेद मिटू शकणार नाही हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी चांगलेचं हेरले होते. एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण हे महात्मा फुले यांना समजलं होतं. त्यासाठीच त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिला आणि अल्पसंख्याकांसाठी शिक्षणासाठी कार्य केले. ते केवळ एक कार्यकर्ते नव्हते तर एक लोकप्रिय भारतीय विचारवंत, लेखक आणि सुधारक देखील होते.ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांचे विचार आणि महान कार्य आजही लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.पाणीटंचाईसारख्या समस्यांवरही उपाययोजना केल्या. त्यांचे ‘गुलामगिरी’ हे पुस्तक आजही क्रांतिकारक मानले जाते.आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 24 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket