पाचगणी येथे सहजयोग प्रणेत्या प.पू. माताजी श्री निर्मलादेवी यांच्या चैतन्यरथाचे भव्य आगमन
पाचगणी प्रतिनिधी :सहजयोग प्रणेत्या प.पू. माताजी श्री निर्मलादेवी यांच्या चैतन्यरथाचे आगमन नुकतेच पांचगणी शहरात झाले. यावेळी पांचगणी व वाई येथील सहजयोग्यांच्या वतीने चैतन्यरथाचे उत्साहात स्वागत व पूजन करण्यात आले.
प.पु माताजींचा जन्म २१ मार्च १९२३ साली मध्यप्रांती छींदवाडा येथे झाला.मेडीकलच्या विद्यार्थीनी असताना त्यांनी स्वातंंत्र्य लढ्यात उडी घेतली व त्यासाठी तुूरूंगवासही भोगला. कालांतराने १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला पण ख-या अर्थाने लोकांनी कुंडलीनी शक्तीच्या स्वरूपात स्वत: मध्ये असलेले स्व तंत्र ओळखलेच अगर प्राप्त केले नव्हते. प. पू माताजींनी १९७० साली सहजयोगाची सहज सोपी पद्धती विकसीत करून त्या द्वारे साधकांची कुंडलीनी जागृत करून त्यांना आत्मसाक्षातकार देण्यास सुरवात केली.
लोकांना स्वचे तंत्र ख-या अर्थाने गवसले.ध्यानधारणेच्या या साध्या सोप्या पद्धतीने लोक तनावमूक्त ,शांत व रोगमूक्त जीवन जगू लागले.पहाता पहाता प.पू माताजी निर्मलादेवी प्रणीत सहजयोग संपूर्ण जगाच्या काना कोप-यात पोहोचला.१९७० साली रूजवलेले बीज आज मोठ्या वृक्षात रूपांतरीत झाले. २३ फेब्रूवारी २०११ साली प.पू.माताजींनी आपले इहलोकीचे अवतार कार्य संपवले व त्या निर्वाणास प्राप्त झाल्या.
त्यांच्या माघारी त्यांचे हे पवित्र कार्य चालूच असून संपूर्ण भारतात व जगातील मोठ्या शहरात सहजयोग ध्यान केंद्रं अविरत चालू आहेत. सहजयोगाच्या प्रचार प्रसारा साठी प.पु.माताजींचा “चैतन्य रथ” संपूर्ण भारतात फिरतो.या चैतन्य रथा मध्ये आधुनिक उपकरणाद्वारे स्क्रीनवर सहजयोगाची विस्तृत माहिती लोकांना देण्यात येवून प्रत्यक्षात लोकांची कुंडलीनी शक्ती सहज सोप्या पद्धतीने जागृत करून लोकांना आत्म साक्षातकार प्राप्त करून दिला जातो ज्यायोगे साधक ध्यानावस्थेत जावून निर्विचारीता प्राप्त करतात व परिणामी तनावमुक्त जीवनशैली आचरणात आणतात.
पाचगणी मध्ये या रथाचे पाचगणी व वाईतील सहजयोग्यांनी स्वागत व पूजन केले.चैतन्यरथ संपूर्ण पाचगणीमध्ये व बाजारपेठे मध्ये फिरला.सोबतच्या सहजयोग्यांनी घरोघर पत्रके वाटून लोकांना सहजयोगाची माहिती व महती सांगून सहजयोगाच्या कार्यक्रमास आमंत्रीत केले. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चैतन्यरथ भाऊसाहेब भिलारे स्टेडीयमवर उपस्थित होता.या वेळी नवीन लोकांना सहजयोगाची माहिती व आत्मसाक्षातकार व कुंडलीनी जागृतीची अनुभूती प्राप्त झाली.
नविन साधकांमध्ये अविराम मेडीकल स्टोअरचे मालक श्री महेंद्र ( लालू ) सावंत,दिलीप होमकर सर,बाळा महाडीक,महेश आनंदा जाधव ,शिंदे सर,सुरेश दुधाणे सर अश्या अनेकांनी कुंडलीनी जागृतीची अनुभूती प्राप्त करून घेतली.कार्यक्रमाचे नियोजन पांचगणीचे श्री नामदेव बागडे व सौ बबीता बागडे आणि भिलारवाशी श्री कामाजी भूजबळ व सौ सूमन भूजबळ यांनी यशस्वी पणे पार पाडले.त्याकामी त्यांना भुईंजचे श्री आबा चिकणे,खिंगरचे तुकाराम नारायण दुधाणे,वाईचे सहजयोग ध्यानधारणा केंद्र प्रमूख श्री नाना सावंत,नारायण सणस व सुनंदा सणस,सुनिल कासुर्डे व योजना कासुर्डे, मांढरे सर व नलीनी मांढरे टीचर, हगवणे,मनिषा कुंभार अश्वीनी कुंभार,भारती फरांदे,.चारू दाहोत्रे,वनिता इरनक, श्रीमती शोभा जमदाडे व पद्मा कारंडे या सर्व सहजयोगी मंडळीची साथ मिळाली.या सर्वांनी पांचगणीतील घरोघरी जावून पत्रके वाटून सहजयोगाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली.




