गोड्या तलावात पेडल बोटिंगचा पर्यावरणावर घातक परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताशी छेडछाड; नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली
सातारा (प्रतिनिधी):पर्यटनाच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोड्या पाण्याच्या तलावांमध्ये पेडल बोटिंग सुरू करण्यात येत आहे. मात्र या मनोरंजनामुळे पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गोड्या तलावांमधून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. अशा पवित्र जलस्रोतांमध्ये बोटिंगमुळे तेल, प्लास्टिक कचरा आणि पर्यटकांकडून फेकल्या जाणाऱ्या वस्तूंचा पाण्यात मिसळ होतो. यामुळे पाण्याची गुणवत्ता घटते आणि जलचर प्राणी तसेच परिसंस्था धोक्यात येतात.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते,पेडल बोटिंगमुळे तलावातील पाण्याचे ऑक्सिजन प्रमाण कमी होते, आवाज आणि रासायनिक प्रदूषण वाढते. परिणामी मासे आणि इतर जलचर जीव मरतात, आणि जैवविविधतेचा समतोल बिघडतो.”
स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तलाव परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.



