गिरिस्थान प्रशालेला शासकीय चित्रकला परीक्षेत 100% यश!
महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत 100% निकालासह एक ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
विशेष म्हणजे, इंटरमिजिएट परीक्षेत इ. दहावीतील कु. ऋग्वेदी संतोष आखाडे, कु. रिया दत्तात्रय कांबळे, कु. समृद्धी तुकाराम सकपाळ, कु. सिद्धी संतोष चोरगे, कु. स्नेहल पंढरीनाथ जाधव, कु. स्वप्नाली भाऊ बोराणे, कु. वेदश्री सुनिल शिंदे, आणि इयत्ता नववी मधील जयदीप सूर्यकांत शिंदे यांनी A श्रेणी प्राप्त केली. तसेच, इ. आठवीतील कु. प्राजक्ता पंढरीनाथ जाधव व स्वप्नील भाऊ बोराणे यांनीही A श्रेणी मिळवत आपली प्रतिभा सिद्ध केली.
चित्रकलेतील या उल्लेखनीय कामगिरीमुळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी वाढीव गुणांचा लाभ होणार आहे.
या यशाबद्दल महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. योगेश बाळकृष्ण पाटील, मुख्य लिपिक श्री. आबाजी ढोबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी.आर. माने सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस.एन. शिंदे व श्री. एच.आर. अवघडे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर.व्ही. बगाडे, मार्गदर्शक कलाशिक्षक श्री. पी.आर. कानडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या या यशाने प्रशालेची प्रतिष्ठा उंचावली आहे.
