गिरिस्थान प्रशालेचा रिटेल विक्री कौशल्य उपक्रम यशस्वी; झेंडू फुलांच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद, विक्रमी १२० किलो फुलांची विक्री
महाबळेश्वर: शासनाच्या व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील ‘रिटेल’ या विषयांतर्गत गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथील इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या सुट्टीचा सदुपयोग करत झेंडूच्या फुलांचा स्टॉल लावून रिटेल विक्रीचे कौशल्य यशस्वीरित्या आत्मसात केले. रिटेल विषय शिक्षक श्री. अभिषेक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विक्री कौशल्य, प्रभावी ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, जाहिरात, संघभावना, वेळेचे व्यवस्थापन आणि आकर्षक सादरीकरण अशा महत्त्वपूर्ण कौशल्यांचा अनुभव घेता आला.
विक्रमी विक्री: मागील वर्षी १०० किलो झेंडू फुलांची विक्री करण्याचा विक्रम विद्यार्थ्यांनी केला होता. यंदा दुसऱ्या वर्षी त्यांनी हा विक्रम मोडीत काढत तब्बल १२० किलो झेंडू फुलांची विक्री करण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.
यशाची सूत्रे:दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठी स्पर्धा असतानाही विद्यार्थ्यांनी फुलांचे आकर्षक हार तयार करणे, लक्षवेधी जाहिरात पोस्टर्स, आकर्षक सवलती आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंग अशा कल्पक उपायांनी ग्राहकांना यशस्वीरित्या आकर्षित केले.
सहभागी विद्यार्थी:या उपक्रमात इयत्ता ११ वीतील श्रुती वाडकर, रिया कांबळे, श्रेया ढेबे, दिशा केळगणे, विद्या सपकाळ, अंकिता कात्रट, तनिष्का शिंदे, इकरा वारुणकर, संचिता काळे, प्रज्ञा घाडगे, आदिती घाडगे तसेच इयत्ता १२ वीतील श्रुती घाडगे, तृप्ती जाधव, तन्वी जाधव, आदित्य घाडगे, संस्कार जाधव, शुभम सपकाळ, युवराज कात्रट, मंथन मोहिते, शुभम ढेबे, करण ढेबे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. योगेश बाळकृष्ण पाटील साहेब यांनी अभिनंदन केले.
मार्गदर्शक आणि नियोजक:गिरिस्थान प्रशालेचे प्राचार्य श्री. पी. आर. माने यांच्या मार्गदर्शनाखाली व रिटेल विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. अभिषेक साळुंखे यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.या प्रकल्पाला शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, पत्रकार, स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



