Home » देश » धार्मिक » गिरिजाशंकर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा आमदार मनोजदादा घोरपडे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

गिरिजाशंकर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा आमदार मनोजदादा घोरपडे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार 

गिरिजाशंकर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा आमदार मनोजदादा घोरपडे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार 

सातारा -गिरजाशंकरवाडी राजाचे कुर्ले येथील श्री गिरिजाशंकर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येथील देवस्थानासोबतच संपूर्ण परिसराला पर्यटन, विकास व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा भाऊ वर्ग दर्जा मिळण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ब वर्ग दर्जा मिळवून दिल्याबद्दल कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

गिरजाशंकरवाडी राजाचे कुर्ले येथील श्री गिरिजाशंकर मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा देण्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचे सहकार्य लाभले आहे. यामुळे या विभागातील पर्यटनस चालना मिळणार असून लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ पर्यटन मंत्री व पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांचे देखील आभार मानले आहेत.

श्री क्षेत्र गिरिजाशंकर देवस्थान राजाचे कुर्ले, श्री भैरवनाथ देवस्थान या सर्व देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे यासाठी गिरिजा देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी मान्य झालेली आहे यावेळी सरपंच डी के बापु व्हाचेअरमन किशोर माने आबासाहेब माने आनंदराव माने तुकाराम माने निलेश माने प्रताप माने तुषार माने सजंय शेडगे धनंजय पाटील धनंजय माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गिरजा शंकर देवस्थणास ब वर्ग दर्जा मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा

Post Views: 444 यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा मानसिक आरोग्य व आत्मशांतीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम

Live Cricket