Post Views: 419
गौतमी पाटीलच्या गाडीचा धक्कादायक अपघात
पुणे -महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात घडला. यात एका रिक्षाला मोठा धक्का बसला असून रिक्षाचालक जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित नव्हती.
अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. धडक झाल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सिंहगड रोड पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
