मुठभर धान्य किलबिल पक्षांसाठी
गौरीशंकरच्या डॉ . पी . व्ही .सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंबचा अभिनव उपक्रम , 300 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग , विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
लिंब – निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षी निरपेक्ष भावनेने मोलाची कामगिरी पार पाडत असतात. .मानवी जीवनामध्ये निसर्गातील पशुपक्ष्यांचे मोल अनमोल आहे. हे ऋणानुबंधाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी निसर्गातील पशुपक्ष्यांचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतूनच प्रेरणा घेऊन गौरीशंकरच्या डॉ . पी .व्ही सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुठभर धान्य किलबिल पशुपक्ष्यांसाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे
लिंब कॅम्पस व आजूबाजूच्या डोंगरावर हे विद्यार्थी आप आपल्या घरातून आणलेले मूठभर धान्य जागोजागी ठेवणार आहेत . त्याचबरोबर मार्च मधील उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता पाहता त्यांच्यासाठी नैसर्गिक जलकुंडा च्या माध्यमातून पाण्याची सोयही करण्यासाठी पुढाकार घेतला आहे .
या उपक्रमासाठी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर , प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पाठबळ दिले आहे .
या उपक्रमासाठी गौरीशंकर च्या सुखात्मे स्कूल मधील 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे
पृथ्वीवरील घडणाऱ्या असंख्य घडामोडीचे साक्षीदार निसर्गातील पशुपक्षी आहेत दूषित वातावरण ,प्रदूषित हवा तसेच अन्न पाण्यावाचून पशुपक्ष्यांची होणारे स्थलांतरामुळे असंख्य पक्षांना आपला जीव गमवावा लागतो .परिणामी निसर्गाची खूप मोठी हानी होते विशेषतः उन्हाळ्यात पशुपक्षीना अन्नपाण्यासाठी भटकंती करावी लागते .त्यामुळे या कालावधीत पशुपक्ष्यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. त्याचा कळत नकळत निसर्गाच्या घडामोडीवर परिणाम होतो यासाठी निसर्गातील पशुपक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी गौरीशंकरच्या डॉ . पी .व्ही सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “मुठभर धान्य किलबिल पक्षांसाठी ” हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे तो इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे असे आव्हान करण्यात येत आहे .
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप , उपाध्यक्ष मिलिंद जगताप , संचालक डॉ . अनिरुद्ध जगताप ,जयवंतराव साळुंखे ,आप्पा राजगे ,प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.