गौरीशंकर फार्मसी विद्यार्थ्यांचे अविष्कार संशोधन स्पर्धेत उत्तुंग यश
शांभवी बहीर व अनुष्का शेडगे ठरल्या सुवर्णपदकाच्या मानकरी. तर प्रतीक कचरे. समृद्धी जाधव यांना रौप्यपदकाचा बहुमान. महाविद्यालयाने सलग तेरा वर्ष विजेत्या पदाची परंपरा कायम राखली. विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव.

देगाव -डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे ( रायगड)यांनी आयोजित केलेल्या विभागीय विद्यापीठ स्तरावरील अविष्कार संशोधन स्पर्धेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस मिरज येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील फार्मसी महाविद्यालयातील 280 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये गौरीशंकर च्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव मधील अंतिम वर्ष एम फार्मसी मधील विद्यार्थिनी शांभवी बहीर हिने ह्युमिनिटीस लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स पदव्युत्तर पदवी या विभागात सुवर्णपदक मिळविले. तर अनुष्का शेडगे हिने कॉमर्स मॅनेजमेंटअँन्ड लॉ पदव्युत्तर पदवी विभागात सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच प्रतीक कचरे यांने कॉमर्स मॅनेजमेंट अँन्ड लाॅ पदव्युत्तर पदवी विभागात रौप्यपदक व समृद्धी जाधव हिने कॉमर्स मॅनेजमेंट अँन्ड लाॅ या विभागात रौप्यपदक मिळवून या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच महाविद्यालयात संस्थेचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन उचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नागेश अलुरकर उपप्राचार्य डॉ योगेश गुरव अविष्कार स्पर्धा समन्वयक डॉ मनोज शिंदे प्रा स्पर्षा बांदेकर डॉ अविनाश भोसले प्रबंधक हेमंत काळे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ अनिरुद्ध जगताप म्हणाले की अविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरी मुळे महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उत्तम असल्याचे दिसून येते. यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ मनोज शिंदे प्रा स्पर्षा बांदेकर यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक जयवंतराव साळुंखे अप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले. प्रास्ताविक व आभार प्रबंधक हेमंत काळे यांनी केले.
औषध निर्माण शास्त्र काळानुसार प्रगल्भ होत असताना नावीन्यपूर्ण संशोधन ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांमधील अंगीभुत कौशल्य बरोबरच त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पकता व शोधनिबंध यांना प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी विद्यापीठ स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये असंख्य विद्यार्थी आपल्या नवनवीन कल्पना व संशोधन सादर करीत असतात. यातून विद्यार्थ्यांना मिळणारे अनुभव भविष्यातील उज्वल करिअर साठी उपयुक्त ठरते. औषध निर्माण क्षेत्रात या स्पर्धेला खूप महत्त्व असल्याने या स्पर्धेत विजेतेपदासाठी मोठी चढाओढ असते.
अविष्कार संशोधन स्पर्धेत गौरीशंकर फार्मसीचे विद्यार्थी नेहमीच चमकदार कामगिरी करून या स्पर्धेत यश प्राप्त करीत असतात. सलग तेरा वर्ष या स्पर्धेत या महाविद्यालयाने विजेतेपद प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव या महाविद्यालयाने या स्पर्धेत आपला नेहमीच ठसा उमटवून संशोधन क्षेत्रात नवा इतिहास घडविलेला आहे.




