Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंब मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न.शिक्षकांना विद्यार्थ्यांनी बेस्ट टीचर ने गौरविले.

गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंब मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न.शिक्षकांना विद्यार्थ्यांनी बेस्ट टीचर ने गौरविले.

गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंब मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न.शिक्षकांना विद्यार्थ्यांनी बेस्ट टीचर ने गौरविले.

लिंब | गुरु शिष्य परंपरेची जपणूक करीत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च,लिंब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाच सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन शिक्षकांचा सन्मान करीत मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी समितीतर्फे महाविद्यालयातील शिक्षकांना फुलांची रोपे देऊन गौरविण्यात आले.तसेच महाविद्यालयातील शिक्षकांना बेस्ट टीचर म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी तृतीय वर्ष बी फार्मसी मधील विद्यार्थिनी नेहा कदम व विद्यार्थी प्रतीक तिकटे यांनी शिक्षक हाच खरा समाज जीवनाचा खरा आधारस्तंभ असून या घटकाचे ऋण कदापी विसरता येणार नाही, तसेच शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करताना विद्यार्थिनी सिद्धी गाढवे हिने शिक्षकांच्या त्यागी वृत्ती जीवनाबद्दल कविता सादर करून सर्वांचे मने जिंकली.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगतीला आकार देताना बऱ्याचदा शिक्षकांना कटू निर्णय घ्यावे लागतात.अर्थात या पाठीमागील शिक्षकांची भूमिका ही पारदर्शक व निरपेक्ष असते.हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे.कार्यक्रमास डॉ. धैर्यशील घाडगे, डॉ.भूषण पवार, प्रा. माधुरी मोहिते, प्रा. रोहन खुटाळे, प्रा. शुभम चव्हाण,प्रा. गौरी इथापे, रजिस्ट्रार निलेश पाटील,विद्यार्थी प्रतिनिधी ओम माने आदि प्रमुख उपस्थित होते.यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे स्वागत करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 87 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket