गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे नवसंशोधनात उत्तुंग कामगिरी डोळ्यातील होणाऱ्या काचबिंदू आजारावर प्रभावी औषध निर्मिती
विद्यार्थिनींच्या नव संशोधनात्मक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर झाला गौरव.
लिंब- भारत सरकारच्या क्रिएटिव्ह आयडियाज व इंनोवाशन्स इन ॲक्शन संशोधन संस्था वरळी मुंबई यांनी देशपातळीवर आयोजित केलेल्या नवसंशोधन स्पर्धेत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील एम फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी डोळ्यात होणाऱ्या काचबिंदू या आजारावर प्रभावी व परिणामकारक औषध निर्मिती बाबत सादर केलेल्या नव संशोधन प्रोजेक्ट ची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. यासाठी महाविद्यालयातील एम फार्मसी मधील विद्यार्थिनी गीतांजली होले, कोमल इचके, श्रद्धा पवार , स्वराली भगत, ओंकार कानडे यांनी या प्रोजेक्टवर विशेष परिश्रम घेत डोळ्यातील होणाऱ्या काचबिंदू या आजारावर सखोल संशोधन करून क्युबोसोम या औषधाची निर्मिती केली आहे. या राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेमध्ये देशभरातील औषधनिर्माण शास्त्र शाखेतील १००० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. यामध्ये गौरीशंकर फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी करून दाखवली आहे. याबद्दल त्यांचा संस्थेचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप यांच्या हस्ते बुके व स्मृतिचिन्ह देऊन उचित गौरव करण्यात आला यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार, डॉ. धैर्यशील घाडगे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप म्हणाले की विद्यार्थ्यांना दर्जात्मक व गुणात्मक शिक्षण देणाऱ्या गौरीशंकर संस्थेने आपल्या कार्याचा ठसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटविला आहे. नवसंशोधन स्पर्धेत विद्यार्थिनींनी केलेल्या उत्तुंग कामगिरीमुळे संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना डॉ. धैर्यशील घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक व आभार डॉ. भूषण पवार यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक जयवंतराव साळुंखे अप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



