कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » गणेश उत्सव प्रमाणेच नवरात्र उत्सव देखील डॉल्बीमुक्तच होणार-उप-विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे

गणेश उत्सव प्रमाणेच नवरात्र उत्सव देखील डॉल्बीमुक्तच होणार-उप-विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे

गणेश उत्सव प्रमाणेच नवरात्र उत्सव देखील डॉल्बीमुक्तच होणार-उप-विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे

पारंपारिक वाद्याचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)नवरात्रोत्सव व दसरा उत्सवात ही डॉल्बी वाजणार नाही… भुईंज पोलिसांचे पारंपरिक वाद्ये वाजवण्याच्या आवाहनास उत्सव कमिटीने सहकार्य करावे असे आवाहन वाई उप-विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केले आहे. 

 भुईंज पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावांच्या नवरात्र उत्सव मंडळाच्या व पोलीस पाटलांच्या संयुक्त मिटिंग मध्ये मार्गदर्शन करताना उप-विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे बोलत होते,यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे उपस्थित होते. 

    यावेळी बोलताना उप-विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पुढे म्हणाले की उत्सव व रूढी परंपरा जपणे हीच खरी आपली संस्कृती आणि संस्कार आहेत ढोल लेझीम खेळून आपली माती व माणसं जपूया त्यांचे महात्म्य जपणे म्हणजेचं उत्सव साजरा करणे, सर्वांनी डॉल्बी बंदी ला प्रोत्साहन देत गणेशोत्सव साजरा केलात तसा नवरात्रउत्सव ही साजरा करू असे आवाहन करून भुईंज पोलिसांच्या विविध उपक्रमांचे कौतुक यावेळी केले,सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले तर गोपनीय पोलीस अधिकारी वैभव टकले यांनी अहवाल वाचन केले. 

याच मिटिंग मध्ये पोलीस पाटील व पत्रकार यांचे वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पांडे गावाचे नवरात्र,आसले भवानी माता,भुईंज महालक्ष्मी मंदिर येथील गर्दी विचारात घेऊन यंदा भुईंज पोलीस जादा कुमुक तैनात ठेवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket