अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शाह यांना निवेदन
मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके, फळबागा तसेच जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले. या निवेदनामध्ये एनडीआरएफच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
