Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » यशोदा इन्स्टिट्यूटस चे संस्थापक प्रा.दशरथ सगरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने यथोचित गौरव

यशोदा इन्स्टिट्यूटस चे संस्थापक प्रा.दशरथ सगरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने यथोचित गौरव

यशोदा इन्स्टिट्यूटस चे संस्थापक प्रा.दशरथ सगरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने यथोचित गौरव

शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अलौकिक कार्याची सुयोग्य दखल , शिक्षण महर्षी डॉ. मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

यशोदा इन्स्टिट्यूटस चे संस्थापक प्रा दशरथ सगरे हे शिक्षण क्षेत्रातील ज्ञानसुर्य म्हणून परिचित आहेत. यशोदा इन्स्टिट्यूटस च्या रूपाने साताराच्या शैक्षणिक जडणघडणीचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे अशा थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारच्या भूमीत बार्शीसारख्या दुष्काळग्रस्त भागातून नोकरीच्या शोधासाठी आलेले व स्वकर्तृत्वावर प्राध्यापक ते संस्थाचालक पर्यंत प्रवास सफल करणारे. ध्येयनिष्ठ व त्यागनिष्ठेने शैक्षणिक क्षेत्राचा वारसा पुढे घेऊन जाणारे ज्ञानकर्मी प्रा. दशरथ सगरे यांनी अल्पवधीतच सातारच्या भूमीत के.जी ते पी.जी पर्यंत ज्ञानाची दालने बहुजनासाठी खुली करून सातारच्या भूमीत नवक्रांती घडविली आहे त्यांच्या कार्याची दखल आजवर अनेक संस्थांनी घेऊन त्यांना उचित सन्मानाने गौरविले आहे सोबत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्काराने देखील त्यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले. बार्शीच्या भूमीत शैक्षणिक नवक्रांती घडविणाऱ्या ज्ञानतपस्वी ज्ञानमहर्षी डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या वैचारिक वारसा व संस्कार संस्कृतीच्या छायेत वाढलेल्या यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना बहुमान प्राप्त झाला आहे.

बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी चंदन प्रमाणे देह झिजविला त्या बार्शीच्या भूमितील ज्ञानतपस्वी शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ. मामासाहेब जगदाळे हे ज्ञान क्षेत्रातील चालते बोलते, ज्ञान संस्काराचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते शिक्षणातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणारे डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी बार्शीच्या भूमीला ज्ञान पंढरीचे स्वरूप दिले गोरगरीब दिन दुबळ्या व वंचित घटकाप्रमाणे रंजल्या गाजल्या समाजाच्या व्यथा व वेदनांना आपल्या कुशीत घेणाऱ्या व संवेदनशीलतेचा भाव मनी असलेल्या स्वर्गीय ङाँ.मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक कार्याला झोकून देऊन कार्य केले त्यांच्या या कार्याचा आजही बार्शीतील भूमिपुत्रांना सार्थ अभिमान वाटतो अशा थोर ज्ञानकर्मीचा नावाने दरवर्षी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय डॉ. मामासाहेब जगदाळे पुरस्कार देऊन गौरविले जाते . सन 2025 चा हा मानाचा पुरस्कार यावर्षी सातारच्या शैक्षणिक क्षेत्रात नवक्रांती घडविणारे यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना प्रदान करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सातारच्या कर्मवीरांच्या भूमित ज्ञानाचे विश्व उभारणारे प्रा. दशरथ सगरे यांना प्राप्त होत आहे पुणे येथे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. आजवर या पुरस्कारामध्ये राज्यभरातील विविध क्षेत्रातून कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला आहे प्रा. दशरथ सगरे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा मानाचा शिक्षण महर्षी डॉ. मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे, पुणे यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरानी उपस्थिती दर्शविली, पद्मश्री पोपटराव पवार, प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिनकरराव जगदाळे, हरिश्चंद्र गडसिंग, डॉ प्रकाश बुरागुटे, बाळासाहेब पाटील, रामराव जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पुणे येथील निळू फुले नाट्यगृह येथे संपन्न झाला.

प्रा दशरथ सगरे यांनी शिक्षण घेताना डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या आदर्श विचाराची छाप ही प्रा.दशरथ सगरे सरांच्या वर पडली ज्या शिक्षण संस्थेने मायेची सावली दिली त्या शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका या योजनेतून श्री शिवाजी मराठा बोर्डिंग मध्ये राहून प्रा. दशरथ सगरे सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले आज त्याच शिक्षण संस्थेच्या एका तपस्वी व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्रा. दशरथ सगरे सरांना प्राप्त झाला हे सातारकरांच्या दृष्टीने भाग्याचा अनमोल क्षण आहे. प्रा.दशरथ सगरे यांना प्राप्त पुरस्कारामुळे सातारच्या शैक्षणिक वैभवात भर पडली असून त्यांच्या कार्याची सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण, उद्योग सहकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ.मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्कार सातारच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणेत मोलाचे कार्य करणारे यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना प्राप्त झाला आहे आजवर राज्यातील विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविले आहे सन 2025 चा हा बहुमान प्रा. दशरथ सगरे यांना प्राप्त झाला आहे हा पुरस्कार रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बीड येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

Post Views: 285 बीड येथील स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बीड येथील

Live Cricket