Home » राज्य » प्रशासकीय » पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत पदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी जिल्हाधिकारी संतोष पाटील

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत पदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी  जिल्हाधिकारी संतोष पाटील

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत पदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी  जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा -शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. तरी जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामधील शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा व्हीसीद्वारे घेतला. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व प्रांत अधिकारी तहसीलदार उपस्थित होते. 

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी व कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नोंदणीचे काम मिशन मोडवर करावे. यासाठी प्रांताधिकारी यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घ्यावी. पदवीधर मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांची व जिल्ह्यातील महाविद्यालयांची मदत घ्यावी. तसेच बरेच शिक्षक ही पदवीधर आहेत त्यांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंद करावी. 

मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी. एकही शिक्षक नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी,अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 250 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket