पाचगणी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा उद्योजक निसार जोहरी यांच्या हस्ते सत्कार
पाचगणी प्रतिनिधी :पाचगणी येथील उद्योजक निसार जोहरी यांच्या हस्ते पाचगणी शहर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे तसेच सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अल राहील टूर अँड ट्रॅव्हल्स (हज-उमराह सेवा) आणि हॉटेल राहील प्लाझाचे मालक निसार जोहरी यांनी यावेळी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हॉटेल राहील प्लाझा, पाचगणी येथे हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.या प्रसंगी नारायणशेठ बिरामणे, राजेंद्रशेठ पारठे, राजेंद्र भगत, अशोक कृष्णा, अफजल भाई यांची प्रमुख उपस्थिती होती.





