Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

मराठी मालिका, चित्रपटविश्वातील प्रसिध्द अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे शुक्रवारी दुपारी दीर्घ आजाराने रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री अंजली व मुलगा असा परिवार आहे. गेल्या 6-7 वर्षापासून त्यांची ब्रेन स्ट्रोक या आजाराबरोबर सुरू असलेली झुंज शुक्रवारी संपली. ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ते घरा- घरात पोहोचले होते.

16 डिसेंबर 1964 मध्ये त्यांचा जन्म नागपूर येथे झाले. डॉ. उजवणे हे मुळचे नागपूरचे. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर मध्येच झाले. गव्हमेंट आर्युवेद महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटक, एकांकिकांमधून भूमिका केल्या. त्यानंतर ते पुण्यात स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांत कामं केली. तिथून ते मुंबईत आल्यावर त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केले. नाना ढाकुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या ‘अन्यायाला फुटले शिंग’ या पहिल्याच नाटकाला त्यांना बक्षीस मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रवेश ते सादर करत. एक अधुरा सपना या एकांकिकेसाठी त्यांना बक्षीस मिळाले, त्या बक्षीस समारंभसाठी आले तेव्हा त्यांना चाणक्य मालिकेत भूमिकेची ऑफर मिळाली.

नाती अनोळखी या नाटकात त्यांनी मधु कांबीकर, राहुल सोलापूरकर यांच्या समवेत काम केले. त्यातून कला जगतला त्यांची ओळख झाली. या नाटकानंतर त्यांना जनता जर्नादन या चित्रपटात भूमिका मिळाली. 110 चित्रपटात त्यांनी कामे केले. 140 मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. 67 नाटकांचे त्यांनी सुमारे 3 हजारांहून अधिक प्रयोग केले. विविध पुरस्काराने त्यांचा सन्मानित करण्यात आले होते. मी अभिनेता नसतो तर राजकीय नेता नक्‍की झालो असतो, असे ते सांगत. त्यांच्या योगदानाची दखल घेत, २०२२ साली त्यांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल दिला गेला.​

गेल्या 6 वर्षांपासून ते ब्रेन स्ट्रोक आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी समाजातून हातभार लागला. आजारातून बरे झाल्यावर त्यांनी कुलस्वामिनी या चित्रपटात भूमिका केली होती. अलीकडे पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे पुन्हा त्यांना रूग्णालयात भर्ती केली होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

Post Views: 19 तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे खटावचे सनशाईन स्कूल ठरले जिल्ह्यातील पहिले रोबोटिक

Live Cricket