Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम सुरू :मा.आ.पृथ्वीराज चव्हाण

ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम सुरू :मा.आ.पृथ्वीराज चव्हाण

ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम सुरू :मा.आ.पृथ्वीराज चव्हाण

सातारा(अली मुजावर )-या पुढील सर्व निवडणुका या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका सरकारने घ्याव्या यासाठी स्वाक्षरी मोहिमेचा रविवारी शुभारंभ करण्यात आला यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथील काँग्रेस कमिटी येथे पदाधिकाऱ्यांसमवेत स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात केली.

सरकारला धारेवर धरण्यासाठी रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार असल्याचे सातारा येतील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. निकाला बाबत आम्ही आत्मपरीक्षण करू पण मारकडवाडी मध्ये जी दडपशाही केली जाते आहे ती ब्रिटिश काळापेक्षा देखील वाईट असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. मारकटवाडी मध्ये ग्रामसभा घेणे हे नागरिक म्हणून त्याचा अधिकार आहे. पारदर्शक निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम होते. पण जर एका व्यक्तीचा विश्वास नसेल तर त्याची दाखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. माझा अधिकार निवडणूक आयोग दडपू शकत नाही. माझ्यावर आणि शरद पवारांवर कारवाई करतो म्हणाले ही ब्रिटिश काळा पेक्षा मोठी हुकूमशाही असल्याचं चव्हाण यांनी सांगितले.देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा खटला असणाऱ्या पक्षांतर बंदी कायद्याबाबत निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड सिंग यांना लोकशाही बळकट करण्याची संधी होती.मात्र त्यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी चंद्रचूड यांच्यावरती केली. 

त्यामुळे बेकायदेशीर सरकार दोन अडीच वर्ष चालवलं गेलं त्याला कोण जबाबदार असा प्रश्न देखील चव्हाण यांनी उपस्थित केलाय.याविषयी ईव्हीएम मशीन बाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन मागण्या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय जुरी समोर काही मशीन देऊन त्या तपासल्या जाव्यात त्याचबरोबर १००% चिठ्ठ्या या मोजल्या जाव्यात अशा दोन मागण्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 130 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket